कोमल कुंभार ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेमुळे ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने साकारलेलं अंजी नावाचं पात्र चांगलंच गाजलं.
नुकतंच कोमलने जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत खास अंदाजात फोटोशूट केलं आहे.
नऊवारी साडीतील या लूकवर अभिनेत्रीने पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
गुढीपाडव्यानिमित्त अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे.
कोमल कुंभारचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून सोशल मीडियावर त्यावर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.