अभिनेत्री रुपाली भोसले हा मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.
आजवर अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं.
आता रुपाली भोसले स्टार प्रवाहवरील 'लंपडाव' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतेय.
अभिनेत्री रूपाली भोसले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोंमध्ये रूपालीने फिकट गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
त्यासोबत तिने घातलेले खड्यांचे दागिने,हातातील अंगठी एकूणच तिच्या लूकला उठाव देत आहे.
रुपालीचं हे नवीन फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.