मराठी सिनेसृष्टीत ‘कलरफुल’ अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत.
बोलके डोळे, मधाळ हास्य आणि आपल्या सहज सुंदर अभिनयातून तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे.
२५ जानेवारी १९९० ला पूजाचा जन्म झाला.
पूजाचे वडील विलास सावंत यांनी वयाची ३० वर्षे अभिनय क्षेत्रात काम केले आहे तर आई अमृता ह्या एक उत्तम गृहिणी आहेत. पूजाच्या वडिलांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केले आहे.
सध्या पूजा तिच्या आगामी 'कप बशी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या नायिकेचं शिक्षण किती झालंय माहितीये का?
पूजा सावंतचं शालेय शिक्षण हे दादरच्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ येथून झालं तर महाविद्यालयीन शिक्षण हे वडाळ्याच्या एम आय ई एस महाविद्यालयातून पूर्ण झालं आहे.
पूजाने एसआयडब्ल्यूएसमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.