ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर.
या मालिकेतील अपूर्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही नायिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
नुकताच ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा पार पडला आहे.
ज्ञानदाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साखरपुड्यातील खास फोटो शेअर केले आहेत.
ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव हर्षद आत्माराम असं आहे. हर्षद हा सिनेमॅटोग्राफर आहे.
या क्षणी दोघांच्याही चेहऱ्यावर निखळ आनंद पाहायला मिळाला.
सध्या या जोडप्यावर कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.