झी मराठीच्या 'कमळी' या मालिकेतून अभिनेत्री विजया बाबर नावारुपाला आली आहे.
या मालिकेत विजया बाबरने कमळीची भूमिका साकारली आहे.
विजया मालिकेत साधा फ्रॉक, केसात वेणी अशा साध्या अंदाजात दिसत असली तरीही रिअल लाईफमध्ये ती खूप ग्लॅमरस आहे.
नुकतेच विजयाने सोशल मीडियावर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
सध्या विजया आपल्या कामातून ब्रेक घेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
अभिनेत्री कोकणात रमली असून ती गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर बोटीत सफर करताना दिसते आहे.
या फोटोंमध्ये तिने डेनिम स्कर्ट,ब्लॅक टॉप परिधान केला आहे. विजयाच्या या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.