तब्बूचं खरं नाव माहितीये का?

तब्बू ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका आहे. 

तब्बूने आजवर हिंदीसह इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

सध्या ही अभिनेत्री  'भूत बंगला' या सिनेमामुळे चर्चेत आहे.

तब्बूचं खरं नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असं आहे.

४ नोव्हेंबर १९७१ ला तिचा हैदराबाद येथे जन्म झाला. 

तिच्या वडिलांचं नाव जमाल हाश्मी व आईचे नाव रिजवाना हाश्मी होतं.

‘पहिला पहिला प्यार’ या सिनेमाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रमुख अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.

पण,  ‘विजयपथ’ या सिनेमातील भूमिकेने तिला खरी ओळख मिळाली.

तब्बूला दोन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि ६ वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला असून, भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केलं आहे.

'रंग माझा वेगळा' मधील श्वेता आता काय करते?

Click Here