मृणाल ठाकूरने 'या' मराठी चित्रपटांमध्ये केलंय काम! 

आपल्या अभिनय गुणांवर टीव्ही मालिका, मराठी-हिंदी चित्रपट असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर.

मृणालचा जन्म १ ऑगस्ट १९९२ ला एका मराठी कुटुंबात झाला. तिचे वडील उदयसिंह ठाकूर युनियन बँकेत सहाय्यक महाप्रबंधक आहेत. 

मृणालला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती व या क्षेत्रात करियर करण्यासाठी तिला तिच्या घरच्यांचा पाठिंबा होता.

बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेमाच्या मनावर राज्य करणाऱ्या मृणालने मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे.

यात 'हॅलो नंदन','विट्टी दांडू','सुराज्य','रंगकर्मी' या चित्रपटांचा समावेश आहे.

दरम्यान, मृणालने तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असतानाच 'मुझसे कुछ कहती ये खामोशिया' (२०१२) या मालिकेद्वारे करियरची सुरुवात  केली.

२०१९ मध्ये आलेल्या हृतिक  रोशनसोबतच्या 'सुपर ३०' या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 

सध्याच्या घडीला मृणाल ठाकूर मनोरंजनविश्वातील आघाडीची नायिका आहे.

राजघराण्यातील आहे 'ही' बॉलिवूड नायिका, गाजवतेय इंडस्ट्री!

Click Here