आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे आदिती राव हैदरी.
'रॉकस्टार','मर्डर ३','पद्मावत' आणि'हीरामंडी' या चित्रपटांमधील संवेदनशील अभिनयासाठी अभिनेत्री अदिती राव हैदरी ओळखली जाते.
हैदराबाद निजामाशी संबंधित असलेल्या तैयबजी-हैदरी राजघराण्यात २८ ऑक्टोबर १९८६ ला आदितीचा जन्म हैदराबाद येथे झाला.
तिच्या आई विद्या राव शास्त्रीय संगीताच्या गायिका होत्या तर वडील एहसान हैदरी होते.
अदिती ही वानपर्थी घराण्याचे राजे 'राजा जे. रामेश्वर राव' यांची नात आहे. जे. रामेश्वर राव हे ब्रिटीशांच्या काळात वानपर्थी घराण्याचे प्रमुख होते.
अदितीचे प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्ये झाले. तिची आई पट्टीची गायिका असल्यामुळे गायनाचे धडे तिला लहान असताना मिळाले.
काही चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करुन अदितीने गायनाचे कौशल्य दाखवून दिले आहे.
२००७ मध्ये शारदा रामनाथन यांच्या 'शृंगारम" या तामिळ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
त्यानंतर तिने अभिषेक बच्चन, सोनम कपूर यांच्यासोबत 'दिल्ली ६' या हिंदी चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.