बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याची नात आहे कियारा अडवाणी, तुम्हाला माहितीये?
भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय गुणांवर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी.
कियारा अडवाणीने अवघ्या काही वर्षांच्या करिअरमध्ये बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले आहे.
महाराष्ट्रातील मुंबई येथे ३१ जुलै १९९२ ला सिंधी व्यावसायिक जगदीप अडवाणी व जन्माने स्पेनिश व शिक्षिका असलेल्या आई जेनेविव जाफरी यांच्या कुटुंबात तिचा जन्म झाला.
कियारा अडवाणीचे दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. तिने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
याबाबतही तिने सांगितले होतं की, माझे आजोबा सईद जाफरीचे भाऊ आहेत. आजोबांनी दोन लग्ने केली होती. माझी पहिली आजी ब्रिटीश होती.
माझ्या आजोबांची दोन लग्न झाली. दुसऱ्या लग्नानंतर भारती गांगुली माझी दुसरी आजी झाली. भारती गांगुली या अशोक कुमार यांची मुलगी होत्या.
दिग्गज अभिनेते स्व.अशोककुमार व अभिनेता स्व. सईद जाफरी यांची नात्याने नात असलेली कियाराने आपलं प्राथमिक शिक्षण मुंबईतील कॅथड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून केलं.
चित्रपटसृष्टीत आधी आलिया भटचे आगमन झालेले असल्याने, कबीर सदानंद यांच्या फगली (२०१४) या चित्रपटातून पदार्पण करताना तिने आपले नाव बदलून कियारा केलं.
तिला ओळख मिळाली ती 'एमएस धोनी' सिनेमातून. त्यानंतर ती कबीर सिंहमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.