अभिनयाची क्षमता आणि सौंदर्याने रुपेरी पडदा व्यापणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे हुमा कुरैशी.
'गँग ऑफ वासेपूर', 'डेढ़ इश्किया', 'बदलापूर' या चित्रपटातून व ओटीटीवरील वेबसीरीज 'लीला' आणि 'महाराणी' मधून आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
२००८ मध्ये,अभिनेत्री होण्यासाठी हुमाने मुंबईत जाण्याचं धाडसी पाऊल उचललं. तिने सिनेमात काम मिळावं म्हणून अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या.
यातून अनुराग कश्यप यांच्या जंक्शन या सिनेमासाठी तिची निवड झाली.पण, हा सिनेमा रिलीज झाला नाही.
तरी हुमाने हार मानली नाही. बऱ्याच संघर्षानंतर काही जाहिराती मिळाल्या.
हुमाने आमिर खानसोबत एका फोनच्या ब्रँडसाठी शूटिंग केल्यानंतर हुमा कुरेशीचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.
'महाराणी सीझन २','महाराणी सीझन ३' मधून ओटीटीवर हुमाच्या अभिनयाची जादू सुरु आहे.