हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मेहनतीने यश मिळविणार्यांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण.
दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९८६ ला झाला. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे.
दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता.
सध्याच्या घडीला तिची गणना इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते.
बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केलं.
पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, नंतर शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली.
सर्वात आधी दीपिका हिमेश रेशमियाच्या तेरा तेरा या म्युझिक अल्बमद्वारे झळकली.
त्यानंतर दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' सिनेमामधून पदार्पण केलं. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाची इंडस्ट्रीतील कारकिर्द सुरु झाली.