'बिग बॉस' मराठीच्या ६ व्या पर्वातून तन्वी कोलते हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं.
यंदाच्या सीझनची तन्वी विजेती ठरली आहे.
आपल्या दमदार खेळीमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधणाऱ्या तन्वीला 'क्विन ऑफ बिग बॉस' म्हटलं गेलं.
'बिग बॉस' ची ट्रॉफी आपल्या नावे करणाऱ्या तन्वीने तिच्या करिअरमध्ये अनेक उतार-चढाव सामना केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा हे तन्वीचं मूळगाव आहे. तिथेच तिने १० वी पर्यंत शिक्षण घेतलं.
त्यानंतर तिने पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केलं. मग तन्वीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली.
रत्नागिरीपासून सुरू झालेला तन्वी कोलतेचा प्रवास आता 'बिग बॉस' मराठी सीझन ६ पर्यंत येऊन पोहोचला.