एक चित्रपट अन् इंडस्ट्री सोडली, आज कोट्यवधींची मालकीण!

बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा बऱ्याच अभिनेत्री सापडतील ज्या पहिल्याच चित्रपटातून स्टार झाल्या. 

तर काहींनी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिनेसृष्टीला कायमचा रामराम केला. तर काहींनी वेगळ्या क्षेत्राची वाट धरली.

यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री गायत्री जोशी.

गायत्रीने २००४  साली प्रदर्शित झालेल्या 'स्वदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

या चित्रपटात तिला शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करायची संधी मिळाली. मात्र, त्यानंतर गायत्री फिल्मी जगतापासून दूरावली.

गायत्री जोशीने १९९९ साली 'मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्ट'मध्ये सहभागी घेतला होता. नंतर तिने काही म्युझिक व्हिडीओ केले.

२००५ साली तिने बिझनेसमन विकास ओबेरॉयसोबत लग्न केलं. यानंतर ती घर संसारातच रमली.

विकास ओबेरॉय अरबपती आहेत. त्यांची नेटवर्थ ४५० कोटी असल्याचं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. ओबेरॉय रियल्टी लिमिटेडचे ते चेअरमन आणि एमडी आहेत. 

मृणाल ठाकूरने 'या' मराठी चित्रपटांमध्ये केलंय काम! 

Click Here