आजच्या पार्श्वगायकांमध्ये आघाडीवरील असलेलं एक नाव म्हणजे अरिजीत सिंह.
पार्श्वगायनासोबतच अरिजीत म्युझिक प्रोग्रॅमर, बैडमिंटन प्लेअर, लेखक असून, माहितीपट देखील तयार करतो.
अरिजीतचा जन्म २५ एप्रिल १९८७ ला जियागंज मुर्शीदाबाद (पश्चिम बंगाल) येथे झाला.
वडील पंजाबी तर आई बंगाली आहे. संगीताचे शिक्षण लहानपणापासूनच घरी सुरु झालं.
त्याने शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर, मिथुन, मॉन्टी शर्मा आणि प्रीतम यांच्यासाठी संगीत प्रोग्रामर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
२०११ ला मिथून यांच्या 'फिर मोहब्बत' या 'मर्डर-२' चित्रपटातील गाण्यातून अरिजीत याने पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं.
मात्र, त्याच्या 'आशिकी २' मधील ‘तुम ही हो’ या गाण्याने इतिहास घडवला. या गाण्यासाठी त्याला फिल्मफेअरचा श्रेष्ठ पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला.
त्यानंतर 'फटा पोस्टर निकला हिरो' मधील 'मैं रंग शरबतों का', 'आर. राजकुमार' मधील 'धोका ढाडी', चेन्नई एक्स्प्रेसमधील 'कश्मीर मैं तू कन्याकुमारी' तसेच 'कभी जो बादल बारसे',अशी गाणी त्याने गायली आहेत.
विविधांगी भावना संवेदनशीलतेने व्यक्त करण्यास सक्षम असणाऱ्या अरिजीतने प्रामुख्याने हिंदी आणि बंगाली अशा विविध भारतीय भाषांमधील गाणी गायली आहेत.
याबद्दल त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.
स्पॉटिफाईने त्याला २०२० ते २०२३ पर्यंत सलग चार वर्षे सर्वाधिक प्रसिध्द भारतीय कलाकार म्हणून घोषित करून त्याच्या प्रतिभेस जागतिक स्तरावर मान्यता दिली आहे.
त्याच्या गायन कारकिर्दीव्यतिरिक्त, अरिजीतने संगीतकार आणि निर्माता म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याची नात आहे कियारा अडवाणी, तुम्हाला माहितीये?