वेब विश्वातील 'क्वीन' म्हणून अभिनेत्री मिथिला पालकरला ओळखलं जातं.
मिथिला तिच्या क्युट बबली अंदाजाने नेहमीच चाहत्यांना प्रेमात पाडते.
मिथिलाने आजवर वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिका तसेच वेबसीरीजमध्ये तिने काम केलं आहे.
२०१४ मध्ये, मिथिलाने 'माझा हनीमून' या मराठी शॉर्टफिल्ममधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला.
मिथिलाच्या टॅलेंटचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अभिनय कौशल्यातून तर तिने सर्वांचं मन जिंकलंच आहे. तसंच ती उत्तम डान्सरही आहे.
अभिनेत्रीचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्यामुळे तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात.
मिथिला पालकरचा जन्म ११ जानेवारी १९९३ रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला.ती फक्त ३३ वर्षांची आहे.
वयाच्या ३३ व्या वर्षी तिने हे यश मिळवलं आहे.