जिया शंकर ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
जियाने आजवर अनेक हिंदी मालिका, सिनेमा आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे.
मात्र, 'वेड' या चित्रपटाने तिला चांगलाच स्टारडम मिळवून दिला.
जिया शंकर सध्या तिच्या नवीन फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
जियाने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
नुकतंच तिने मकर संक्रांतीनिमित्ताने खास फोटोशूट केलं आहे.
सुंदर नऊवारी साडी त्यावर साजेसे दागिने परिधान करून जियाने मराठमोळा लूक केला आहे.
अभिनेत्रीचं हे पारंपरिक फोटोशूट नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं आहे.
"तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! हॅप्पी मकर संक्रांती...",असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.