पाहा नक्की कोण आहे तो?
'सैराट' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे जोरदार चर्चेत आली आहे.
रिंकूच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.
अशातच तिने चक्क आपल्या आयुष्यातील 'रोमिओ'ची ओळख करून दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रिंकूने नुकताच सोशल मीडियावर एक अत्यंत गोंडस फोटो शेअर केला आहे. मात्र, हा 'रोमिओ' कोणी तरुण नसून तिचा लाडका पाळीव श्वान (Pet Dog) आहे.
रिंकूने आपल्या या लाडक्या श्वानाचे नाव 'रोमिओ' ठेवले असून, त्याच्यासोबत खेळतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत.
"भेटा माझ्या आयुष्यातील खऱ्या रोमिओला," असे कॅप्शन तिने या फोटोला दिले असून ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.
रिंकूने शेअर केलेले हे फोटो व्हायरल झाले आहेत.