बॉलिवूड स्टार्स ज्यांनी मुलांना दत्तक घेत, प्रेमाने दिलं नवीन आयुष्य...
बॉलिवूडमधील अशा काही जोड्या आणि कलाकार, ज्यांनी मुलांना दत्तक घेऊन मायेची सावली दिली.
सनी आणि तिचा पती डॅनियल यांनी २०१७ मध्ये लातूरमधील 'निशा' या चिमुकलीला दत्तक घेतले.
अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि त्यांची दुसरी पत्नी योगिता यांनी दिशानीला दत्तक घेतले होते.
सुष्मिता सेनने रेने आणि अलीशा अशा दोन मुलींना दत्तक घेतल, तिने सिंगल मदर म्हणून त्यांना प्रेमाने वाढवलं.
लग्नाआधीच वयाच्या २१ व्या वर्षी रविनाने पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांचे आयुष्य सावरले.
सलीम खान आणि त्यांची दुसरी पत्नी हेलन यांनी 'अर्पिता' हिला दत्तक घेतले होते.
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री साक्षी तंवरने २०१८ मध्ये ८ महिन्यांच्या 'दित्या'ला दत्तक घेतले होते.
गुरमीत चौधरी आणि देबिना या जोडीने बिहारमधील पूजा आणि लता या दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण आणि भविष्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
जय भानुशाली आणि माही विज यांनी त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या केअरटेकरच्या दोन मुलांना खुशी आणि राजवीर यांना दत्तक घेतले आहे.