कल्की कोचलीन आणि अनुराग कश्यप मागील वर्षी वेगळे झाले. असे असले तरी बरेचदा ते दोघे त्यांच्या नात्याबाबत ज्या प्रतिक्रिया देतात, त्यामुळे आताही त्यांच्यात जवळीक असल्याची जाणीव होते; पण असे काही नाही. कल्की कोचलीनने स्पष्ट केले आहे की, दोघांमधील दुरावा आजही कायम आहे. एका टीव्ही शोमध्ये कल्की म्हणाली की, मी आणि अनुराग वेगळे झालो आहोत; पण आम्ही आजही मैत्रीचे नाते निभावत आहोत. अनेक गैरसमज, दुरावा आणि दु:खानंतरही आमच्यात काहीतरी उरले आहे. तो माझा सर्वात चांगला मित्र आहे.