Join us

‘पीके’सोबत येणार ‘वजीर’

By admin | Updated: December 8, 2014 00:51 IST

आमिर खानचा बहुचर्चित ‘पीके’ हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटासोबतच अनुष्का शर्मानिर्मित ‘एनएच १०’ या चित्रपटाचे ट्रेलरही लाँच होणार

आमिर खानचा बहुचर्चित ‘पीके’ हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटासोबतच अनुष्का शर्मानिर्मित ‘एनएच १०’ या चित्रपटाचे ट्रेलरही लाँच होणार आहेच; परंतु आणखी एका चित्रपटाचे ट्रेलरही ‘पीके’सोबतच लाँच होणार आहे. हे ट्रेलर महानायक अमिताभ बच्चनच्या ‘वजीर’चे असेल. ‘पीके’चा निर्माता विधू विनोद चोप्रा याने ‘वजीर’ची काही दृश्ये बघितली आणि आपल्या चित्रपटासोबतच ‘वजीर’चे ट्रेलरही लाँच करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘वजीर’चे नाव पूर्वी ‘दो’ असे होते. नंतर हे नाव बदलण्यात आले. या चित्रपटात अमिताभ हा बुद्धिबळाचा चॅम्पियन, तर फरहान अख्तर दहशतविरोधी पथकाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल. अदिती राव हैदरी ही या चित्रपटात असेल.