Join us

विद्या होणार सुचित्रा सेन

By admin | Updated: March 21, 2015 23:28 IST

लग्न झाल्यानंतर विद्या बालनने मोजकेच चित्रपट केले. इतक्यात तर तिचा कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे तिच्याकडे गोड बातमी आहे की काय, असेच वाटत होते.

लग्न झाल्यानंतर विद्या बालनने मोजकेच चित्रपट केले. इतक्यात तर तिचा कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे तिच्याकडे गोड बातमी आहे की काय, असेच वाटत होते. मात्र ही अफवा असल्याचे ती साईन करत असलेल्या चित्रपटावरून दिसते आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री सुचित्रा सेन यांच्यावरील चित्रपटात सुचित्रा सेनची भूमिका विद्या बालन साकारणार आहे. सुचित्रा यांच्या नाती रायमा आणि रिया सेन या दोघी हा चित्रपट करत आहेत. सुचित्रा सेन आणि विद्या बालन यांच्यात साम्य म्हणजे दोघांचेही बंगाली भाषेवर आणि कोलकात्यावर प्रेम आहे. या गोष्टींमुळेच विद्याची वर्णी लागली.