Join us  

अत्यंत कंटाळवाणा अनुभव

By admin | Published: November 14, 2014 10:57 PM

प्रेम आणि मैत्री अशी सरमिसळ असलेल्या चित्रपटांमध्ये नेहमी बघितले जाणारे मसाले ‘किल दिल’ चित्रपटात पाहायला मिळतात.

प्रेम आणि मैत्री अशी सरमिसळ असलेल्या चित्रपटांमध्ये नेहमी बघितले जाणारे मसाले ‘किल दिल’ चित्रपटात पाहायला मिळतात. यशराज कंपनीत बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अलीने केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून अशा धाटणीचे चित्रपट बघितलेल्या प्रेक्षकांना हा चित्रपट अत्यंत कंटाळवाणा वाटेल. महत्त्वाचे म्हणजे  यशराज कंपनी असा टुकार चित्रपट काढेल असे अजिबात वाटत नाही. 
दिल्लीत देव (रणबीर सिंह) आणि टुटू (अली जफर) राहतात. या दोघांना लहानपणापासून भय्याजी (गोविंदा)ने वाढवलेले असते. सुपारी घेऊन लोकांचा खून करण्याचे काम भय्याजी करत असतो. त्याच्या इशा:यावर देव आणि टुटू कोणाचाही खून करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. असे चालू असतानाच एक दिवस देवची भेट दिशाशी (परिणीती चोप्रा) होते. देवला दिशा आवडू लागते. कालांतराने तीही त्याच्या प्रेमात पडते. आपण आता वाईट मार्ग सोडून नव्याने चांगले आयुष्य जगावे असे देव ठरवतो. पण भय्याजींना त्याचा हा निर्णय पटत नाही. देवचे पूर्वायुष्य दिशाला कळल्यावर दिशा त्याच्यापासून दुरावते. देवचे भय्याजींबरोबरचे संबंधही बिघडतात. शेवटी देव आणि दिशा एकत्र येतात.
उणिवा - मोठय़ा कालावधीनंतर दिग्दर्शनात उतरलेल्या शाद अलीकडून इतक्या वाईट चित्रपटाची अपेक्षा नव्हती. प्रत्येक पातळीवर चित्रपट गडबडलेला आहे. लहानपणापासूनच एका गँगस्टरच्या आश्रयाला असलेली दोन मुले, त्यांची घनिष्ठ मैत्री, गँगस्टरसाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी, मग एक श्रीमंत मुलगी येऊन तिच्या प्रेमात पडणो, त्यासाठी गुन्हेगारी वृत्ती सोडण्याची तयारी, त्यानंतर पुढे घडणा:या घटना.. अशा आशयावर 8क्च्या काळापासून आतार्पयत अनेक चित्रपट बनले आहेत. त्यामुळे शादनेही असाच चित्रपट तयार केला. हेच कथानक हिट होईल आणि लोकांना आवडेल, अशी त्याची अपेक्षा असावी. पण चित्रपटाचा वेग काही कालावधी गेल्यानंतर मंदावतो आणि त्यानंतर मात्र तो कंटाळवाणा होतो. पहिल्यांदा शाद अलीने देव-टुटूच्या जय-वीरूप्रमाणो असलेल्या मैत्रीवर फोकस केला. त्यानंतर देव आणि दिशाचे प्रेम. या भानगडीत भय्याजीच्या भूमिकेवर मात्र योग्य लक्ष दिले गेले नाही. शेवटी शेवटी तर या भूमिकेला काही अर्थच नाही, असेही वाटायला लागते. शाद अली चित्रपटावरचे तसेच भूमिकांवरचे नियंत्रण राखू शकलेले नाहीत. शेवटाबद्दल तर न बोललेलेच बरे. शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत आणि गुलजारांची गाणी चित्रपटाला तारू शकलेली नाहीत. एकही गाणो लक्षात राहत नाही. तांत्रिकदृष्टय़ाही चित्रपटाचा दर्जा सरासरी आहे. 
वैशिष्टय़े - कमकुवत भूमिका असूनही ती अत्यंत ताकदीने पेलण्याचा प्रयत्न गोविंदाने केलेला आहे. नृत्याची नेहमीची शैली दाखवत अभिनयातही तो बाजी मारतो. कित्येक वर्षानी मिळालेल्या पावरफूल भूमिकेचे गोविंदाने सोने केले आहे. रणबीर सिंह आणि अली जाफर यांच्याही भूमिका चांगल्या आहेत, तर परिणीती चोप्राने ग्लॅमरची गरज पूर्ण केली आहे. पण अभिनयाच्या बाबतीत मेहनत घेण्याची तिला गरज आहे.