अभिनेता वरुण धवन आपल्या कथित गर्लफे्रंड नताशा दलालसोबत स्पॉट झाला. नेहमी आपल्या खासगी आयुष्याला मीडियापासून दूर ठेवणारा वरुण धवन गर्लफे्रेंड नताशासह अपार्टमेंटच्या बाहेर निघताना दिसला. त्यानंतर दोघे पटकन कारमध्ये बसले आणि कुठेतरी निघून गेले. वरुण कारच्या पुढच्या सीटवर बसला तर नताशा मागच्या सीटवर बसलेली दिसली. वरुणने नताशासोबतच्या नात्याविषयी कधीच बातचीत केली नाही; परंतु दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिले जात आहे.
वरुणची गर्लफ्रेंड ?
By admin | Updated: April 20, 2015 00:42 IST