बॉलीवूड अभिनेत्री श्रद्घा कपूरच्या मते वरुण धवन आजच्या पिढीतील सर्वात प्रतिभावंत अभिनेता आहे. श्रद्धाचे ‘आशिकी-२’ आणि ‘एक विलेन’ हे चित्रपट १00 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाले आहेत. आता ती वरुण धवनसोबत ‘एबीसीडी २’ मध्ये दिसणार आहे. श्रद्धा म्हणाली की, ‘मी वरुणसोबत चित्रपटाचे शूटिंग करण्याबाबत उत्साहित आहे, तो आमच्या पिढीतला सर्वात प्रतिभावंत अभिनेता आहे. आम्ही सारख्याच फिल्मी वातावरणात वाढलो आहोत. शूटिंगदरम्यान आम्ही आमच्या वडिलांसोबत जात असू.