Join us  

स्वरा भास्करने केली उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:51 PM

स्वराने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जेव्हा लोकांचा विचार न करता मंदिर, गाय या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाते....

ठळक मुद्देस्वराने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, महिलांवर होत असलेल्या अपराधांसाठी गुन्हेगाराला तेव्हाच शिक्षा होत नाही. जेव्हा लोकांचा विचार न करता मंदिर, गाय या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाते.

स्वरा भास्कर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती ट्विटरवर अनेक सामाजिक प्रश्नांवर आपले मत व्यक्त करत असते. ती सोशल मीडियावर अनेक वेळा समोरच्यांची बोलती बंद करते तर काही वेळा तिला तिच्या मतांसाठी ट्रोल देखील केले जाते. स्वराने नुकत्याच केलेल्या एका ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

उत्तर प्रदेश मधील उन्नावमध्ये काही दिवसांपूर्वी एका शेतात दोन लहान मुलींचे मृतदेह मिळाल्यानंतर खळबळ माजली होती. या प्रकरणावर भडकलेल्या स्वराने आता एक ट्वीट केले आहे आणि या ट्वीटद्वारे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील बबुरहा गावातील एका शेतात दोन दलित मुलींचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला होता. या दोन मुलींसोबत आणखी एका मुलीवर देखील अत्याचार करण्यात आले होते. त्या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलींना खाण्यातून विष देण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मीडियात दाखवण्यात आली होती.  या घटनेमुळे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील ट्वीट करत या घटनेचा निषेध नोंदवला होता. 

रिचा चड्ढा, स्वरा भास्कर यांनी या घटनेवर ट्वीट केले आहे. अनेकांनी ट्वीट करत या प्रकरणानंतर मुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा दिला पाहिजे असे म्हटले होते. स्वरा भास्करने आता ट्वीट करत उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यशैलीवर बोट दाखवले आहे.

स्वराने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, महिलांवर होत असलेल्या अपराधांसाठी गुन्हेगाराला तेव्हाच शिक्षा होत नाही. जेव्हा लोकांचा विचार न करता मंदिर, गाय या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाते. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्था यावर देखील तिने प्रश्न विचारला आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :स्वरा भास्करउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण