Join us

परिणितीपाठोपाठ बार्बीही बॉलीबूडमध्ये

By admin | Updated: June 30, 2014 22:12 IST

प्रियंका चोप्राची बहीण बार्बी हांडाही आता चित्रपटांत येण्याच्या मार्गावर आहे. बार्बी तेलगू चित्रपटांतून करिअरची सुरुवात करीत आहे.

प्रियंका चोप्राची बहीण बार्बी हांडाही आता चित्रपटांत येण्याच्या मार्गावर आहे. बार्बी तेलगू चित्रपटांतून करिअरची सुरुवात करीत आहे. यापूर्वी तिची चुलत बहीण परिणिती चोप्रा बॉलीवूडमध्ये आली होती. तिने ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर मागील वर्षी मीरा चोप्राने ‘गँग्ज ऑफ घोस्ट’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यापूर्वी मीरानेही काही दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीराच्या पावलावर पाऊल ठेवत आता बार्बीनेही दक्षिण भारतीय चित्रपटांचा मार्ग निवडला आहे. लवकरच ती बॉलीवूडमध्येही दिसू शकेल.