Join us  

उमेशचा सुपर हॉट लूक

By admin | Published: May 11, 2016 1:49 AM

कलाकारांना नेहमीच आपण सर्वांपेक्षा वेगळे अन् युनिक दिसावे असेच वाटत असते. त्यामुळे सतत आपल्या लुक्सवर एक्सपिरीमेंट करणारे हे सेलीब्रिटीज डिफरंट दिसायच्या प्रयत्नात असतात

कलाकारांना नेहमीच आपण सर्वांपेक्षा वेगळे अन् युनिक दिसावे असेच वाटत असते. त्यामुळे सतत आपल्या लुक्सवर एक्सपिरीमेंट करणारे हे सेलीब्रिटीज डिफरंट दिसायच्या प्रयत्नात असतात. मग तो लूक्स एखाद्या चित्रपटासाठी असो किंवा स्वत:साठी. बरेच असे कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटातील भूमिकांसाठी मेकओवर केला अन् तो लूक त्यांच्यासाठी लकी ठरला. बॉलीवूडमध्ये असे अनेक तारे आपल्याला सापडतील, ज्यांनी मेकओवर केला आहे. आता असाच एकदम हटके लूक मराठी इंडस्ट्रीतील हॅण्डसम हंक उमेश कामत याने केला आहे. उमेशने एकदमच हॉट फोटोेशूट सध्या केले आहे. फ्रेंच बिअर्ड अन् डोळ्यांवर गॉगल अशा कूल लूकमध्येसुद्धा उमेश कमालीचा हॉट दिसत आहे. उमेशच्या या लूकबद्दल ‘सीएनएक्स’ने त्याला विचारले असता तो म्हणाला, एक वेगळा एक्सपिरिमेंट म्हणून मी हे फोटोशूट केलंय. मी याआधी दाढी जास्त ठेवायचो नाही; परंतु आता हा दाढीतील लूक प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. माझा मित्र तेजस नेरुरकर याने हे फोटोशूट मुंबईतच केले आहे. माझ्या आगामी प्रोजेक्टसाठीदेखील हा लूक असल्याचे त्याने सांगितले. मात्र, उमेशचा हा लूक नक्की सिनेमासाठी की नाटकासाठी असणार आहे, ते मात्र त्यानं गुलदस्त्यातच ठेवलं आहे.