Join us

या अभिनेत्याने साकारली आहे फॅमिली मॅन 2 मध्ये चेल्लमची भूमिका, सोशल मीडियावर आहे याचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 16:29 IST

फॅमिली मॅन 2 मध्ये श्रीकांतला कोणत्याही गोष्टीविषयी माहिती हवी असल्यास तो चेल्लमला विचारतो आणि चेल्लमला सगळ्याच गोष्टी माहीत असल्याने तो लगेचच त्या गोष्टींविषयी सांगतो.

ठळक मुद्देअभिनयापेक्षा उदय महेश यांना दिग्दर्शन आणि लेखनात अधिक रस आहे. त्यांनी कबाली, मद्रास कॅफे यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 

फॅमिली मॅन 2 या वेबसिरिजची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या या वेबसिरिजची कथा, कलाकारांचा अभिनय सगळे काही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या वेबसिरिजमधील एक कलाकार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. यावर विविध मीम्स देखील बनवले जात आहेत.

फॅमिली मॅन 2 मध्ये श्रीकांतला कोणत्याही गोष्टीविषयी माहिती हवी असल्यास तो चेल्लमला विचारतो आणि चेल्लमला सगळ्याच गोष्टी माहीत असल्याने तो लगेचच त्या गोष्टींविषयी सांगतो. हाच चेल्लम सध्या चांगलाच प्रसिद्ध झाला असून चेल्लमवरून सोशल मीडियावर मीम्स देखील बनत आहे.

या वेबसिरिजमध्ये चेल्लमची भूमिका उदय महेश यांनी साकारली असून ते तामीळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी दीपन या व्यक्तिरेखेसाठी सुरुवातीला ऑडिशन दिले होते. पण चेल्लम या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. 

अभिनयापेक्षा उदय महेश यांना दिग्दर्शन आणि लेखनात अधिक रस आहे. त्यांनी कबाली, मद्रास कॅफे यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 

टॅग्स :मनोज वाजपेयी