Join us

आर्ची-परश्याच्या प्रेमाची साक्षीदार असलेली ' ती' फांदी तुटली

By admin | Updated: January 17, 2017 10:56 IST

सैराट चित्रपटात नायिका आर्ची ज्या फांदीवर बसली होती, तीच फांदी तुटल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत
करमाळा ( सोलापूर), दि. १७ - आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कोणत्या गोष्टीला कशी प्रसिद्धी मिळेल सांगता येत नाही. माणसं , प्राणी सोडाच पण पुतळे आणि निर्जीव वस्तू एवढच काय झाडेही ट्रेंडिगमध्ये येतात. असेच एक ट्रेंडिंगमधलं झाल म्हणजे 'सैराट' चित्रपटातील आर्ची-परश्याचा प्रेमाचे साक्षीदार असलेले निष्पर्ण झाड.. समधुर संगीत , फ्रेश स्टारकास्ट आणि मनाचा ठाव घेणारी कथा यामुळे गेल्या वर्षी आलेल्या नागराज मंजुळेंच्या ' सैराट' चित्रपटाने आबालवृद्धांना वेड लावलं. झिंगाट गाण्यावर ठेका धरणारे रसिक ' सैराट झालं जी' गाण्यानेही मंत्रमुग्ध झाले. चित्रपटाला मिळालेल्या तूफान यशामुले कलाकार तर फेमस झालेच पण चित्रपटातील सर्व लोकेशन्सवरही गर्दी जमू लागली. 'सैराट'च्या टायटल साँगमध्ये दाखवण्यात आलेले ते निष्पर्ण झाडही खूप फेमस झाले. मात्र गाण्यात आर्ची ज्या फांदीवर बसली होती, तीच फांदी तुटली असून यामुळे सोशल मीडियावर सैराटप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. 
(करण जोहर झाला 'सैराट', विकत घेतले रिमेकचे हक्क!)
(सैराट फेम आर्चीला पाहण्याच्या नादात वीजेचा धक्का बसून तरूण जखमी)
 
 
आर्ची-परश्याने एकमेकांकडे प्रेमाची कबुली दिल्यानंतर गाण्यातून त्यांचे प्रेम फुलताना दिसले आहे. त्या गाण्यात आर्ची आणि परशा एका वाळलेल्या झाडावर बसल्याचे दाखवण्यात आले. सोलापुरातील करमाळा भागात हे चित्रीकरण झाले. मात्र चित्रपट हिट झाल्यानंतर ते झाडही चांगलच प्रसिद्ध झालं आणि तो भाग एक सेल्फी पॉईंट बनला. शेकडो चाहत्यांनी  या झाडाला भेट देऊन फोटोही काढले. मात्र आता त्याच झाडाची एक फांदी तुटली आहे.  पर्यटकांनी सतत झाडावर चढल्या-उतरल्यामुळे ही फांदी तुटल्याचे समजते. 
झाडाची फांदी तुटल्याची बातमी ‘इंटरनेट’च्या वेगानं सोशल मीडियावर पसरली. त्यामुळे चाहते प्रचंड निराश झाले असून हळहळ व्यक्त होत आहे.