Join us  

म्हणून बाहुबलीमधील श्रीदेवीची संधी हुकली

By admin | Published: May 09, 2017 6:45 PM

बाहुबली चित्रपटात राम्या कृष्णन हिने साकारलेले महाराणी शिवगामी देवीचे पात्र भाव खाऊन गेले. पण राम्या ही या भूमिकेसाठी दिग्दर्शक राजामौली यांची पहिली पसंत नव्हती

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागातील अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबली या दोन्ही पात्रांबरोबरच इतर पात्रेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. खलनायक भल्लालदेव, कटप्पा, देवसेना, अवंतिका आणि महारणी शिवगामी देवी या पात्रांची बाहुबलीएवढीच चर्चा झाली आहे. यापैकी राम्या कृष्णन हिने साकारलेले महाराणी शिवगामी देवीचे पात्र बऱ्यापैकी भाव खाऊन गेले. पण राम्या ही या भूमिकेसाठी दिग्दर्शक राजामौली यांची पहिली पसंत नव्हती. तर ही भूमिका श्रीदेवीने करावी यासाठी ते प्रयत्नशील होते. 
महाराणी शिवगामी देवीची व्यक्तिरेखा श्रीदेवीने साकारावी यासाठी तिच्याकडे विचारणाही झाली. पण श्रीदेवीने या भूमिकेसाठी 6 कोटी रुपयांची मागणी केली. मात्र या पात्रासाठी एवढी  मोठी रक्कम देणे निर्मात्यांसाठी अवघड होते. त्यामुळे त्यांनी श्रीदेवीऐवजी राम्या हिला शिवगामी देवीच्या भूमिकेसाठी पसंती दिली आणि तिनेही समर्थपणे ही भूमिका साकारत शिवगामी देवीची व्यक्तिरेखा अजरामर केली.  
 
 दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा "बाहुबली - 2 द कन्क्ल्युजन" सिनेमा 28 एप्रिल रोजी देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्याबरोबरच दोन वर्षांपासून ज्या प्रश्नाच्या उत्तराची सर्वांनी आतुरतेनं वाट पाहिली, ती रहस्यमय कथा सर्वांना माहिती होणार आहे. दरम्यान, बाहुबली-2 चित्रपटाने आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडला आहे.