Join us

या कारणामुळे विशाल आदित्य सिंहने अवघ्या सात दिवसांत कमी केले पाच किलो वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:11 IST

विशाल आदित्य सिंह सध्या या मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेत आहे. तो या मालिकेत तेवर या रॅपरची भूमिका साकारत आहे. या भूमिकेच्या मागणीमुळे विशालने आपले वजन घटवले आहे.

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत आहेत. या मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. या मालिकेच्या कथानकाला आता काही वळणं मिळणार आहेत. या मालिकेत नुकतीच विशाल आदित्य सिंहची एंट्री झाली असून त्याच्या एंट्रीनंतर मालिका प्रेक्षकांना अधिक आवडेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे.विशाल आदित्य सिंह सध्या या मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेत आहे. तो या मालिकेत तेवर या रॅपरची भूमिका साकारत आहे. या भूमिकेच्या मागणीमुळे विशालने आपले वजन घटवले आहे. दिग्दर्शकाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणाऱ्या विशाल आदित्यने या भूमिकेला साजेसे होण्यासाठी आपल्या शरीरात त्यानुरूप बदल घडविले आहेत.‘चंद्रकांता’ या भव्य मालिकेत राजपुत्र वीरेन्द्र (वीर) प्रतापसिंहच्या भूमिकेमुळे विशाल आदित्य सिंहला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेत त्याने योद्धाची व्यक्तिरेखा साकारल्याने त्याला आपले शरीर बलदंड ठेवावे लागले होते. पण ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेत त्याला रॅपरची भूमिका रंगवायची होती आणि त्यासाठी त्याला बारीक अंगकाठी ठेवणे भाग होते. त्याला आठवडाभरात आपले वजन घटविण्यास सांगण्यात आले होते. याविषयी विशाल आदित्य सिंह सांगतो, “‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेसाठी चित्रीकरण सुरू करण्यास आठवडा उरला असताना मला मालिकेच्या टीमकडून फोन आला आणि त्यांनी मला माझं वजन घटविण्यास सांगितलं. ती गोष्ट मी तात्काळ मनावर घेऊन माझ्या आहारात आणि व्यायामात योग्य ते बदल केले आणि त्याचा मला चांगला परिणाम दिसून आला. यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली, पण मी आता मला टीव्हीवर बघतो, तेव्हा ही मेहनत सार्थकी लागल्याचं समाधान वाटते. ही भूमिका माझ्या मनासारखी असून तिच्यासाठी मी अतिशय मेहनत घेत आहे. यापूर्वी माझं वजन 99 किलो होतं, पण आता ते 88-89 किलो झाले आहे.”विशाल आदित्य सिंहचा या मालिकेतील लूक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी त्याला खात्री आहे.