Join us  

बिग बॉसच्या 'या' कंटेस्टंला लागली बॉलिवूड सिनेमांची लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 4:30 PM

'वीरा - एक वीर की अरदास ' या मालिकेत दिगांगना झळकली होती. याच मालिकेत तिला खूप लोकप्रियताही मिळाली. या मालिेकेनंतर ती बिग बॉस 9 वा सिझन या रिअॅलिटी शोमध्ये झळकली.

बॉलीवुडच्या सलमान, शाहरुख आणि आमिर या खान त्रयींसह काम करायला मिळावं अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. त्यापैकी मोजक्या अभिनेत्री अशा असतात ज्यांना कोणतीही संधी मिळो यश संपादन करण्यासाठी खूप मेहनत घेतात. अशी बिग बॉसची एक्स स्पर्धक  दिगांगना सूर्यवंशी सध्या लाइमलाइट पासून लांब असली तरीही ती लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार  आहे.' वीरा - एक वीर की अरदास ' या मालिकेत दिगांगना झळकली होती. याच मालिकेत तिला खूप लोकप्रियताही मिळाली. या मालिेके नंतर ती बिग बॉस 9 वा सिझन या रिअॅलिटी शोमध्ये झळकली. त्यानंतर तिला सिनेमात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे ती छोट्या पडद्यावर झळकलीच नाही.

दिगांगना ने 'वीरा' मालिके नंतर  2015 में बिग बॉस शोमध्ये भाग घेतला होता.वयाच्या 7 व्या वर्षापासून दिगांगना काम करत आहे. आता तिला साचेबद्ध काम करण्यात रस नसून सिनेमात आपले नशीब आजमवायचे आहे.दिगांगनाचे खूप मोठे केस होते.सलमानच्या सांगण्यावरून तिने आपले जीवापाड जपलेले केसही कापले.तसेच मालिकेत तुम्ही सतत झळकत असतात त्यामुळे सिनेमाच्या ऑफर्सही कमी मिळतात.असे होवू नये म्हणून तिने टीव्ही मालिकांसाठी अालेल्या अनेक ऑफर्सना नकार दिल्याचेही म्हटले आहे. जोपर्यंत सिनेमाच्या ऑफर्स मिळत नाही तोपर्यंत  टीव्हीवर झळकणार नसल्याचा निर्धारच तिने केला होता.

आता दिगांनाच्या मेहनतीला नशीबानेही साथ दिली आहे.लवकरच ती रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.दिगांगना एक नाही दोन नाही तर चक्क तीन सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत.त्यामुळे ती खूप खुश आहे.सलमान खानच्या रूपात चांगला मेंटॉर मिळाला असल्याचेही ती सांगते.मात्र सलमान खानकडून तिला कोणत्याच सिनेमाची ऑफर मिळाली नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे तिलाही सलमानसोबत सिनेमात काम कराण्याची इच्छा आहे.चांगले काम करत राहा आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळतेच.त्यानुसार सलमानसह काम करण्याची इच्छाही पूर्ण होईल असेही तिने म्हटले आहे.त्यामुळे भविष्यात सलमानसह दिगांगना झळकल्यास आश्चर्य वाटायला नको.