Join us  

तारक मेहता का उल्टा चष्मामधील हा कलाकार आहे दिशा वाकानीचा खऱ्या आयुष्यातील भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 6:17 PM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक कलाकार खऱ्या आयुष्यात दिशाचा भाऊ आहे.

ठळक मुद्देदयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी सप्टेंबर, २०१७ पासून मालिकेत दिसत नाही.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अभिनेत्री दिशा वाकानीनेदेखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे दयाबेनची. या शोमुळे दिशा घराघरात लोकप्रिय झाली. गेल्या काही वर्षांपासून दिशा वाकानी मालिकेतून गायब आहे.

तुम्हाला माहीत आहे का, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक कलाकार खऱ्या आयुष्यात दिशाचा भाऊ आहे. मयुर वकानी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दया भाभी म्हणजेच दिशा वकानीच्या भावाची भूमिका साकारतो आहे आणि खऱ्या आयुष्यात देखील तो तिचा भाऊ आहे.

 

दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी सप्टेंबर, २०१७ पासून मालिकेत दिसत नाही. ती मॅटर्निटी लिववर गेली होती. त्यानंतर तिने नोव्हेंबरमध्ये मुलीला जन्म दिला. ती मालिका सोडून अनेक वर्ष झाली आहेत आणि अद्याप ती परतली नाही.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी