Join us  

रिअल लाईफमध्ये सूपर सिस्टर्सचे खऱ्या आयुष्यातले नातेही तितकेच घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 2:50 PM

सोनी सब वाहिनीवरील 'सूपर सिस्टर्स' या मालिकेतील या दोन बहिणींचे नातेही असेच दृढ आणि आदर्शवत आहे. 

कोणतीही मालिका असो, मग ती विनोदी असू दे वा कल्पनात्मक आशयाची... भावंडांमधले नाते नेहमीच घट्ट असते. भावंडांमधला बंध हा सर्वांत घट्ट बंध असतो आणि म्हणूनच पडद्यावरची भावंडेही प्रेक्षकांच्या मनात घर करतात. सोनी सब वाहिनीवरील 'सूपर सिस्टर्स' या मालिकेतील या दोन बहिणींचे नातेही असेच दृढ आणि आदर्शवत आहे. 

सूपर सिस्टर्समधल्या शिवानी (वैशाली ठक्कर) आणि सिद्धी (मुस्कान बामणे) या पडद्यावरच्या बहिणी. शिवानी ही सर्वांशी प्रेमाने वागणारी, सर्वांना आदर देणारी गोड, निरागस मुलगी आहे आणि त्याउलट, मुस्कान ही टिपीकल टॉमबॉय. मालिकेत त्यांच्यातले नाते अगदी घट्ट आहे आणि त्या नेहमीच एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. त्या एकमेकींसाठी प्रोटेक्टिव्ह असतात, एकमेकींवर खूप प्रेम करतात आणि प्रसंगी एकमेकींची ढालही बनू शकतात. 

वैशाली आणि मुस्कान यांनी नुकतेच कबूल केले आहे की, केवळ पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही त्यांचे नाते खूप घट्ट आहे. याबाबत विचारल्यावर सोनी सबवरील सूपर सिस्टर्समध्ये शिवानीच्या भूमिकेत दिसणारी वैशाली ठक्कर म्हणाली, “मला सख्खी बहीण नाही पण, मुस्कानने ती जागा भरून काढली आहे. आम्ही एकेकींसोबत खूप वेळ घालवतो आणि आम्हाला ते आवडते. ती दिवसभर मला खूप चिडवते पण नंतर प्रेमाने मिठीही मारते. या शहरात मला तिच्या रुपाने लहान बहीण मिळाली आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.’’

सोनी सबच्या सूपर सिस्टर्समध्ये सिद्धीची भूमिका साकारणारी मुस्कान बामणे म्हणाली, “मी सुरूवातीला आमच्या सेटवर कुणालाच ओळखत नव्हते. वैशालीने मला प्रत्येक टप्प्यावर लहान बहिणीसारखे वागवले. तिने मला कधीच एकटे सोडले नाही. माझ्या खाण्या-पिण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींकडे ती लक्ष पुरवते, विश्रांतीच्या वेळेतही माझी काळजी घेते. मला पडद्यावर आणि पडद्याबाहेरही अशी बहीण मिळाली आहे, याबद्दल मी स्वतःला नशीबवान मानते. सोनी सब सूपर सिस्टर्सची मी आभारी आहे.’’सुपर सिस्टर्स ही मालिका ६ ऑगस्टपासून सुरु झालेली असून अल्पावधीतच मालिकेने रसिकांची पसंती मिळवण्यात यश मिळवले आहे.