Join us  

सुंदरा मनामध्ये भरलीमधील या अभिनेत्रीमुळे अक्षया नाईकला सेटवर भासत नाही आईची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 3:10 PM

या मालिकेतील कलाकारांमध्ये आता खूप चांगले नाते तयार झाले आहे.

ठळक मुद्देअक्षया यावर सांगते, “अतिशा ताई आणि इंदू यामध्ये खूप साम्य आहे. ती खऱ्या आयुष्यात देखील खूप मायाळू आहे, मदतीसाठी नेहेमी तयार असते. माझ्या कामात देखील मला तिचं मार्गदर्शन मिळत असतं.

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिका संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये भरली असं म्हणायला हरकत नाही. यामधील सगळ्याच पात्रांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून या मालिकेतील कलाकारांमध्ये आता खूप चांगले नाते तयार झाले आहे. खूप वेळ एकत्र काम करत असल्याने सेटवर एकत्र राहून हे बॉंडिंग बऱ्याच कलाकारांमध्ये बघायला मिळतं. मालिकेच्या शूट दरम्यान सेटवरील काही कलाकारांमध्ये चांगली मैत्री होते, ते एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखू लागतात. तसंच काहीसं इंदूच्या भूमिका साकारणार्‍या अतिशा नाईक आणि लतिका म्हणजेच अक्षया नाईक यांच्यामध्ये झालं. या दोघांचे ऑनस्क्रीन सासू – सून नातं असलं तरीदेखील त्यांच्यात कोणताही वाद नसल्याचे आपल्याला मालिकेत पाहायला मिळतं. ही मालिका पाहिल्यानंतर इंदूसाररखी सासू, आई मिळावी आणि लतिका सारखी समजूतदार मुलगी, सून मिळावी असं सगळ्यांच्या मनामध्ये येऊन जातं. अगदीच तसेच त्यांचे ऑफस्क्रीन नाते देखील खूप छान आहे. 

 अक्षया यावर सांगते, “अतिशा ताई आणि इंदू यामध्ये खूप साम्य आहे. ती खऱ्या आयुष्यात देखील खूप मायाळू आहे, मदतीसाठी नेहेमी तयार असते. माझ्या कामात देखील मला तिचं मार्गदर्शन मिळत असतं. कसं माझं काम अजून चांगलं होईल यासाठी नेहेमी मला ती मदत करते. तिच्याकडे सगळ्या अडचणींवर उपाय असतात. कुठल्याही गोष्टीला ती कधीच नाही म्हणत नाही. आम्ही सेटवर तसेच शूटिंग संपल्यावर खूप गप्पा मारतो, मला तिच्या रूपात चांगली मैत्रीण मिळाली आहे. कधी कधी अतिशा ताई आम्हाला गोष्टी सांगते. दिवाळीला तिने आमच्यासाठी फराळासोबत एक पत्र दिलं होतं तेव्हा खूप आनंद झाला होता. आम्ही सगळेच घरापसून लांब आहोत, पण आईची कमतरता ती असल्यामुळे भासत नाही इतकं प्रेम ती आमच्यावर करते.” 

टॅग्स :कलर्स मराठी