Join us  

‘आई कुठे काय करते’मध्ये संजनाशी लग्न न करण्याचा अनिरुद्धचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2021 12:14 PM

आई कुठे काय करते’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

ठळक मुद्देअनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट घ्यायचा नाहीये. आप्पांकडे त्याने तसं बोलूनही दाखवलं आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’  या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील आप्पा, कांचन, अनिरूद्ध, अरूंधती, इशा, अभिषेक, यश, गौरी आणि संजना या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट घ्यायचा नाहीये. आप्पांकडे त्याने तसं बोलूनही दाखवलं आहे. द्विधा मनस्थितीत अडकलेल्या अनिरुद्धला आता संजनाशी लग्नही करायचं नाहीय. अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा संभ्रम निर्माण झाला आहे. अनिरुद्धच्या या निर्णयाचे नेमके काय पडसाद उमटणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

एकीकडे अनिरुद्धचं दुटप्पी धोरण तर तिकडे अभिषेक आणि अंकिताच्या नात्यातही कडवटपणा पाहायला मिळतोय. अभिषेकने लग्न करावं म्हणून अंकिताने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अंकिताने खरंच आत्महत्येचा निर्णय घेतला होता की नाटक रचलं होतं याचा तपास आता अभिषेक करणार आहे. 

अंकिताचा खोटारडेपणा उघड झालाच तर तिला घरातून बाहेर निघण्याची सक्त ताकीदही त्याने दिलीय. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे भाग दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहेत.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका