Join us  

बिट्टी बिझनेसवाली मालिकेसाठी बिट्टी म्हणजेच प्रकृती मिश्राने गायले हे गाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:49 PM

बिट्टी बिझनेसवाली या मालिकेत बिट्टीची भूमिका उत्साहात साकारत असतानाच तिने मालिकेसाठी हे अतिरिक्त योगदान खूपच सृजनशील पद्धतीने दिले आहे आणि परफॉर्मर म्हणून खरोखर चमक दाखवली आहे.

अत्यंत प्रतिभावान आणि बहुअंगी कलावंतांनी भरलेल्या भारतीय मनोरंजन उद्योगात, अनेक अभिनेत्यांची गाणी गाण्याची किंवा त्यांचा स्वत:चा अल्बम लाँच करण्याची महत्त्वाकांक्षा असते. त्याचप्रमाणे, अनेक गायकांना अभिनय करण्याची इच्छा असते. मात्र, दोन्ही गोष्टींत उत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्यं खूप कमी कलावंतांकडे असतात. प्रकृती मिश्रा अर्थात बिट्टी बिझनेसवाली मधील बिट्टीने नुकतेच एक गाणे गायले आहे. या अत्यंत प्रतिभावान आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने खास बिट्टी बिझनेसवाली मालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या गाण्याला आपला आवाज दिला. या मालिकेत बिट्टीची भूमिका उत्साहात साकारत असतानाच तिने मालिकेसाठी हे अतिरिक्त योगदान खूपच सृजनशील पद्धतीने दिले आहे आणि परफॉर्मर म्हणून खरोखर चमक दाखवली आहे.यातील कळीचा मुद्दा म्हणजे ही मालिका आणि हे गाणे दोन्ही स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या विषयावर आधारित आहे. ही बाब प्रेक्षकांना खूप आवडली आहे. प्रकृतीची संगीतातील प्रतिभा हे काही गुपित नाही, कारण ती संगीताची मुळे खोलवर रुजलेल्या एका कुटुंबातूनच आलेली आहे. तिने प्रोमोसाठी हवे असलेले हे गाणे केवळ एका टेकमध्ये रेकॉर्ड केले! हे गाणे संगीतबद्ध केले आहे प्रख्यात संगीतकार रूशील दलाल यांनी. लव्ह सेक्स और धोखा, मिथ्या आणि क्या यही है सचसारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेले आहे. हे गाणे लिहिले आहे गुणी अमित मिश्राने. संगीतातील या कामगिरीबद्दल विचारले असता प्रकृती सांगते, “बिट्टी बिझनेसवाली या माझ्या मालिकेसाठी गाणे गाण्याची संधी मिळाली, तेव्हा मला अत्यानंद झाला. विशेषत: हे गाणे स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. गाण्याला खूपच सुंदर चाल लावण्यात आली आहे आणि ते रेकॉर्ड करण्याचा अनुभव कल्पनेपलीकडचा होता. मला गाण्याची आवड सुरुवातीपासूनच आहे आणि अभिनयासोबत गाण्याची प्रतिभा कधी उपयोगात आणण्यासाठी मी उत्सुक होतेच. बिट्टी बिझनेसवालीला माझ्या हृदयात वेगळेच स्थान आहे, मग ती मालिकेची संकल्पना असो किंवा व्यक्तिरेखा. मी त्यात स्वत:ला बघू शकते.”