Join us

बिग बॉस : नीतिभा कौलचा घरातील प्रवास संपला; आणखी एक स्पर्धक जाणार घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 15:09 IST

बिग बॉस सिझन - १० अंतिम टप्यात असून, सध्या ग्रॅण्डफिनालेकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे शोमध्ये दर दिवसाला ट्विस्ट आणि ...

बिग बॉस सिझन - १० अंतिम टप्यात असून, सध्या ग्रॅण्डफिनालेकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे शोमध्ये दर दिवसाला ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहे. या आठवड्यात नीतिभा कौल हिचा घरातील प्रवास संपला असला तरी याच आठवड्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार असल्याने शोमध्ये ट्विस्ट निर्माण झाला आहे. बिजनेस आॅफ सिनेमाने दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री सर्व स्पर्धकांना एविक्शनमुळे धक्का बसणार आहे. गाढ झोपेत असलेल्या स्पर्धकांना अचानकच गार्डन एरियामध्ये एकत्र जमण्यास सांगितले जाणार आहे. त्यानंतर घराबाहेर पडणाºया सदस्याचे नाव घोषित केले जाणार आहे. हा निर्णय घरवाल्यांसाठी धक्कादायक ठरणार असून, तो सदस्य कोण असेल याचे नावदेखील समोर आले आहे. या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २८ जानेवारी रोजी बिग बॉस सिझन-१० च्या ग्रॅण्ड फिनालेचे आयोजन केले आहे. वीकेण्ड का वॉरमध्ये नीतिभा कौल हिला घराबाहेर काढल्याने घरात आता मनवीर गुर्जर, मनू पंजाबी, मानोलिसा, रोहन मेहरा, बानी जे, लोपामुद्रा राऊत हे सदस्य आहेत. मात्र आणखी एका सदस्याला म्हणजेच मोनालिसाला घराबाहेर काढले जाणार आहे. आपल्याला माहीत आहे की, दररोज बिग बॉसच्या घरात एक गाणे वाजवून घरातील सदस्यांना उठविले जाते. मात्र आज त्यांना अर्ध्या रात्री वेक अप कॉलमुळे उठावे लागणार आहे. यावेळेस मोनालिसाच्या नावाची घोषणा करून बिग बॉस इतरांना आश्चर्यचकीत करणार आहेत. रिपोर्टनुसार मोनालिसाला नीतिभानंतर सर्वाधिक कमी वोट मिळाले आहेत. गेल्या काही आठवड्यांपूर्वी मनू आणि तिच्यातील संबंधांमुळे तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह तिच्यावर जबरदस्त संतापला होता. यामुळे मोनालिसा घरात काहीसी चिंताग्रस्त दिसत होती. शिवाय तिने घराबाहेर पडण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यातच तिला कमी वोट मिळाल्याने तिचा घराबाहेर पडण्याचा मार्ग जवळपास सुकर झाला आहे. मोनालिसा घराबाहेर पडल्यास मनू पंजाबी, मनवीर गुर्जर, रोहन मेहरा, लोपामुद्रा राऊत आणि बानी जे हेच सदस्य घरात राहणार आहेत. त्यातही मनवीर गुर्जर याने अगोदरच फिनालेचे तिकीट मिळविले असल्याने मनू, रोहन, लोपा आणि बानीमध्ये जोरदार फाइट बघावयास मिळण्याची शक्यता आहे.