Join us  

राखी सावंत म्हणतेय, मी आहे डॉक्टर... पण एमबीबीएसचा फुलफॉर्म विचारल्यावर उडली भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:01 PM

राखी बिग बॉसमध्ये हंगामा करताना दिसत आहे. आता तर डॉक्टर बनून आजारांपासून दूर राहाण्यासाठी काय करायचे यावर ती उपाय सांगताना दिसत आहे.

ठळक मुद्देराहुल थेट राखीला एमबीबीएसचा फुलफॉर्म विचारणार आहेत. त्यावर काय उत्तर द्याचे हेच राखीला कळणार नाहीये.

बिग बॉस १४ मध्ये आपल्याला आतापर्यंतच्या सिझनमध्ये दिसलेले काही सेलिब्रेटी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडची कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये झळकत आहे. पूर्वीच्या सिझनमध्ये राखीमुळे कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाऊन हंगामा करत आहे.

राखी सावंत बिग बॉसच्या घरातील विकास गुप्ताला आपला भाऊ मानत आहे तर अर्शीला सुनावताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर अर्शीसोबत प्रचंड भांडताना देखील ती दिसत आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागांमध्ये राखी सावंत डॉक्टर बनून घरात असणाऱ्या सदस्यांना आजारांपासून दूर राहाण्यासाठी काय करायचे हे शिकवताना दिसणार आहे. तर यावर अली गोनी आणि राहुल वैद्य तिची टर उडवताना दिसणार आहेत. 

राहुल थेट राखीला एमबीबीएसचा फुलफॉर्म विचारणार आहेत. त्यावर काय उत्तर द्याचे हेच राखीला कळणार नाहीये. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे पाहाण्यासारखे असणार आहेत. काय उत्तर देऊ हे कळत नसल्याने राखी शिंक येण्याचे नाटक करून इतर सदस्यांना एमबीबीएसचा फुलफॉर्म विचारणार आहे. 

कलर्सच्या इन्स्टाग्रामवर आपल्याला बिग बॉसचा एक प्रोमो पाहायला मिळत आहे. यात आजारांपासून दूर राहाण्यासाठी बटाटा खायचा असे राखी राहुलला सांगताना दिसत आहे. त्यावर राहुल आणि अली तिची टर उडवत तिला एमबीबीएसचा फुलफॉर्म विचारत आहेत.  

राखी सावंतप्रमाणे तिचा पतीदेखील बिग बॉसमध्ये झळकणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राखी बिग बॉसच्या घरात गेल्यापासून तिचा पती विविध वाहिन्यांना मुलाखती देताना दिसत आहे. रितेशने एका मुलाखतीत बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा वर्तवली आहे. रितशने एका मुलाखतीत सांगितले आहे की, मला बिग बॉसच्या ख्रिसमस स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावण्याबाबत विचारण्यात आले होते. पण त्यावेळी मी प्रचंड बिझी होतो. पण मी कधी घरात जाऊ शकतो याविषयी मी कार्यक्रमाच्या टीमला सांगितले आहे. याबाबत मला जानेवरीच्या पहिल्या आठवड्यात वाहिनीद्वारे सांगण्यात येईल. घरात जाऊन मला राखीला सपोर्ट करायचा आहे. राखी ही खूपच चांगली व्यक्ती आहे. ती माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. 

टॅग्स :राखी सावंत