Join us  

भुषण कडूच्या पत्नीच्या निधनानंतर व्हायरल होतोय हा व्हिडिओ, पाहून तुम्ही देखील व्हाल भावुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 5:22 PM

कादंबरी यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देसुरुवातीला कादंबरी यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिथून केईएम रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी बिग बॉस फेम आणि कॉमेडी अभिनेता भुषण  कडू यांच्या पत्नी कादंबरी कडू यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु कोरोनासोबत लढाई लढण्यात त्या अयशस्वी ठरल्या. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.

कादंबरी यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भुषण आणि कादंबरी यांचे लग्न कसे ठरले याविषयी ते दोघे सांगताना दिसत आहे. नवरा असावा असा या मालिकेतील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून केवळ भुषणचे फॅन्सच नव्हे तर सगळेच भावुक होत आहेत.

सुरुवातीला कादंबरी यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिथून केईएम रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नी कादंबरीच्या निधनाने भुषण कडूसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.          

बिग बॉस(Big Boss) मध्ये भुषण कडूने सांगितलेला किस्सा मराठी बिग बॉसच्या अनसीन एपिसोडमध्ये भुषण कडूने एक विनोदी आठवण सांगितली होती. तो त्याच्या कुटुंबियांना कोकणातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेला होता. आज आपल्या मेहनतीने आणि कामाने भुषण मराठी लोकांच्या घराघरात ओळखला जातो. पण त्याला या रेस्टॉरंटमध्ये एक वेगळाच अनुभव आला. याविषयी भुषणने सुशांतला सांगितले, मी माझ्या कुटुंबियांना घेऊन हॉटेलमध्ये गेलो, तर त्या हॉटेलच्या मालकाने माझे इतकं विचित्र पद्धतीने कौतुक केलं की, मला स्वत:च्या पर्सनॅलिटीवरच शंका आली. इतकंच नाही सगळ्या कुटुंबियांच्या जेवणाचाही बट्ट्याबोळ झाला. या मालकाने आपल्या मुलाची माझी ओळख करून देण्यासाठी त्याला बोलावलं. पण ही ओळख फारच गमतीशीर पद्धतीने करून देण्यात आली. त्याच्या मुलाने माझ्याकडे पाहावं, कारण मी स्टार असलो तरी माझे वागणं बोलणं इतकंच नाही तर माझी पर्सनॅलिटी सेलिब्रिटीसारखी वाटत नाही, असं तो म्हणाला. या वाक्याने माझ्या कुटुंबियांना हसूच फुटलं.                                                                          

टॅग्स :भूषण कडु