Join us  

सौम्या टंडन भाभीजी घर पर है ही मालिका सोडणार का? वाचा काय सांगतेय सौम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 3:58 PM

सौम्या भाभीजी घर पर है ही मालिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. सौम्या ही मालिका सोडणार हे कळल्यावर तिच्या फॅन्सना देखील चांगलाच धक्का बसला होता. सौम्याने ही मालिका सोडू नये असे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण तिला सांगत होते.

भाभीजी घर पर है ही मालिका सुरू झाल्यापासूनच ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेतील विभूती, अंगूरी भाभी, अनिता या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील सौम्या टंडनला काही लोक गोरी मॅम नावाने ओळखतात, तर काही लोक तिला अनिता भाभी या नावानेही ओळखतात. सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी भाभीजी घर पर है या मालिकेमुळे मिळाली. सौम्या भाभीजी घर पर है ही मालिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. सौम्या ही मालिका सोडणार हे कळल्यावर तिच्या फॅन्सना देखील चांगलाच धक्का बसला होता. सौम्याने ही मालिका सोडू नये असे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण तिला सांगत होते. पण आता सौम्यानेच ती मालिका सोडतेय ही केवळ एक अफवा असल्याचे सांगितले आहे. ती ही मालिका सोडणार नसल्याचा खुलासा तिने सोशल मीडियाद्वारे केला आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर तिने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, मी मालिका सोडणार हे कळल्यापासून माझ्या फॅन्सना धक्का लागला आहे. मला लीव्हर इन्फेक्शन झाल्यामुळे मी आठवडाभरापासून चित्रीकरण करत नव्हते. पण गेल्या तीन दिवसांपासून मी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट असलेल्या सौम्याचा जन्म मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात झाला. पुढे तिचा परिवार उज्जेनला शिफ्ट झाला. तिचे शिक्षणही उज्जेनलाच झाले. पण ती कामानिमित्त मुंबईत आली आणि गेल्या कित्येक वर्षापासून मुंबईत राहात आहे.