बढो बहू आणि संयुक्त या मालिकांनी मारली सेंच्युरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 17:49 IST
बढो बहू आणि संयुक्त या मालिकेची टीम सध्या प्रचंड खूश आहे. कारण या मालिकांनी नुकतीच सेंच्युरी पूर्ण केली आहे. ...
बढो बहू आणि संयुक्त या मालिकांनी मारली सेंच्युरी
बढो बहू आणि संयुक्त या मालिकेची टीम सध्या प्रचंड खूश आहे. कारण या मालिकांनी नुकतीच सेंच्युरी पूर्ण केली आहे. या निमित्ताने दोन्ही टाम मोठे सेलिब्रेशन करणार आहेत. संयुक्तच्या टीमसाठी या मालिकेच्या निर्मात्यांनी एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले आहे तर बढो बहू या मालिकेची टीम आपला आनंद केक कापून मालिकेच्या सेटवरच साजरा करणार आहेत. बढो बहू या मालिकेच्या निर्मात्या दिप्ती कलवाणी यांनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर एक पोस्ट करून आपल्या टीमचे अभिनंदन केले आहे. बढो बहू या मालिकेचे एक पोस्टर इन्टाग्रामवर टाकून त्यांनी खाली एक सुंदर संदेश लिहिला आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, हे बघा, 100 पूर्ण झाले बढोचे... यावरून वढो 100 वर्षांची झाली असे तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्ण चुकीचे आहे. माझ्या बढोचे 100 भाग पूर्ण झाले आहेत. आज आपण सगळ्यांनी मिळून एकत्र जेऊया, गप्पा मारुया, खूप नाचूया, चला वेळ करू नका लवकर या सेलिब्रेशनसाठी... 'बढो बहू' या मालिकेत प्रेक्षकांना लकी सिंह आणि कोमल या दाम्पत्याची मनोरंजक कथा पाहायला मिळत आहे. या दोघांचे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालंय. प्रिन्स नरुला यात रेसलरच्या भूमिकेत दिसत असून त्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. तसेच हरयाणवी भाषाही शिकली आहे. ‘संयुक्त’ ही मालिका एका संयुक्त कुटुंबाची कथा आहे. पूर्वी सगळे एका कुटुंबात गुण्यागोविंदाने नांदायचे. पण गेल्या काही वर्षांत विभक्त कुटुंबपद्धती फोफावली आहे. मुलं-बाळ होईपर्यंत मुलांना आईवडिलांची गरज नसते. मात्र मुलं-बाळ झालीत की अर्थात गरज पडली की, आई-वडिलांना जवळ बोलवले जाते. मुळात गरजेसाठी नाही तर प्रेमासाठी कुटुंब एकत्र यायला हवं हा संदेश या मालिकेद्वारे देण्याचा प्रयत्न केला जात आहे.