Join us  

बापमाणूस मालिकेत वाजणार सूर्या आणि गीताच्या लग्नाचे सनई चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:54 AM

बापमाणूस या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की, दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांनी आता सर्व सूत्रं स्वतःच्या हातात घेतली आहेत.

रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच भावत आहेत. 

बापमाणूस या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की, दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांनी आता सर्व सूत्रं स्वतःच्या हातात घेतली आहेत. सध्या मालिकेत एक अनोखे वळण प्रेक्षकांनी पाहिले. शालूचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यानंतर शब्बीर आणि गीताला सन्मानाने वाड्यात आणण्यात आले आहे. गीताने त्यासाठी सूर्याचे आभार मानले आहेत. गीता वाड्यात नसताना घर खूप शांत वाटायचं आणि तिची खूप आठवण यायची अशी कबुली सूर्या गीताला देतो. पण हे आईसाहेब ऐकतात आणि सगळ्यांसमोर सूर्या आणि गीताच्या लग्नाची घोषणा करतात. रमाकांतला आईसाहेबांनी परस्पर घेतलेला हा निर्णय आवडत नाही आणि म्हणून तो आईसाहेबांना हे लग्न करू नका असे समजवण्याचा प्रयत्न करतो. निशा गीताचं अभिनंदन करते आणि हेही म्हणते की, हे लग्न नीट पार पडले पाहिजे... कारण वाड्याला शापच आहे की, लग्नाच्या दिवशी काहीतरी वाईट घडतं... त्यामुळे गीता घाबरते. वाड्यात सूर्या गीताच्या लग्नाची तयारी सुरू होते. गीताला मेहंदी लावायच्या क्षणी आईसाहेब भावुक होतात आणि खोलीत दादासाहेबांच्या जुन्या वस्तू काढून बसतात... तिथे गीता येते आणि त्यांना सांभाळते. गीताला दादासाहेबांची एक डायरी सापडते आणि ती डायरी वाचते. त्यामुळे दोघी भावुक होतात. पण "आमचा निशावर  संशय आहे," असे त्यांनी लिहिलेले पान त्यांचे वाचायचं राहते. 

सूर्या आणि गीताचं लग्न सुरळीत पार पडेल का? निशाचं पुढचं पाऊल काय असेल? हे प्रेक्षकांना बापमाणूस या मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :बापमाणूससुयश टिळक