Join us

सनीचे नखरे वाढले

By admin | Updated: June 21, 2014 23:07 IST

बॉलीवूडची बोल्ड बाला सनी लियोनला सध्या जबरदस्त मागणी आहे,

बॉलीवूडची बोल्ड बाला सनी लियोनला सध्या जबरदस्त मागणी आहे, याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, निर्माता दिग्दर्शकांना सनीच्या अटींवर काम करावे लागत आहे. पुढील महिन्यात रिलीज होणा:या ‘हेट स्टोरी-2’ या चित्रपटातील ‘पिंक लिप्स’ या आयटम साँगचे शूटिंग करायचे आहे. सनीला या गाण्याच्या रिहर्सलसाठी वेळ काढता आला नाही. सनी सध्या स्प्लिटस्विला या कार्यक्रमाची होस्ट असून ती जयपूरमध्ये आहे. सूत्रंनुसार या गाण्याच्या रिहर्सलसाठी सनीने मुंबईला यायला नकार दिला, तेव्हा नाईलाजाने कोरियोग्राफर उमा आणि गॅटीला सनीसाठी जयपूर गाठावे लागले. या गाण्याचे शूटिंग मात्र मुंबईलाच करावे लागणार आहे. ‘हेट स्टोरी-2’ मध्ये सुरवीन चावला आणि जय भानुशाली मुख्य भूमिकेत आहेत.