Join us

खटला पुढच्या वर्षीच संपणार

By admin | Updated: December 25, 2014 02:18 IST

अभिनेता सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन खटला आता पुढच्या वर्षीच संपणार आहे़ कारण बुधवारी सत्र न्यायालयाने याची सुनावणी येत्या ८ जानेवारीपर्यंत तहकूब केली़

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन खटला आता पुढच्या वर्षीच संपणार आहे़ कारण बुधवारी सत्र न्यायालयाने याची सुनावणी येत्या ८ जानेवारीपर्यंत तहकूब केली़या खटल्यात एका आरटीओ अधिकाऱ्याची साक्ष नोंदवण्याचे काम बुधवारी संपले़ मात्र या साक्षीदाराला साक्ष देण्यासाठी पुन्हा बोलवावे, अशी विनंती करणारा अर्ज विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला़ त्यावर बचाव पक्षाला प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली़ बारा वर्षांपूर्वी सलमानने भरधाव गाडी चालवत वांद्रे येथे चौघांना चिरडले़ यात एकाचा बळी गेला़ सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे़ यात दोषी आढळल्यास सलमानला १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते़ (प्रतिनिधी)