Join us  

सोनम बनणार दिग्दर्शिका

By admin | Published: June 29, 2016 12:37 AM

सोनम कपूरला म्हणे दिग्दर्शनाचे वेध लागले आहेत.

सोनम कपूरला म्हणे दिग्दर्शनाचे वेध लागले आहेत. सोनम ही उत्तम अभिनेत्री आहे, हे तर तिने सिद्ध केले आहेच, पण आता सोनमला दिग्दर्शक बनायचे आहे. एका मुलाखतीत खुद्द सोनमनेच हा खुलासा केला. होय, मी दिग्दर्शन करू इच्छिते आणि यासाठी एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. मी लवकरच कॅमेऱ्याच्या मागे अ‍ॅक्शन म्हणताना दिसेन, अशी मला आशा आहे, असे ती म्हणाली. मी चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. भारतात असंख्य प्रतिभावान लोक आहेत. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळेल, असेही सोनम म्हणाली. याचा अर्थ, तिचा पहिला दिग्दर्शित चित्रपट हा सत्यकथेवर आधारित असावा, असे सोनमला वाटतेय.