Join us  

सोनाक्षीने घटविले वजन

By admin | Published: December 01, 2014 12:32 AM

तेवर’ निमित्त निर्माता बोनी कपूर हा पहिल्यांदाच मुलगा अर्जुन कपूरसोबत काम करीत आहे. चित्रपटाची नायिका सोनाक्षी सिन्हासोबत काम करताना बोनी अत्यंत उत्साही होता

‘तेवर’ निमित्त निर्माता बोनी कपूर हा पहिल्यांदाच मुलगा अर्जुन कपूरसोबत काम करीत आहे. चित्रपटाची नायिका सोनाक्षी सिन्हासोबत काम करताना बोनी अत्यंत उत्साही होता. ‘तेवर’मधील ‘राधा नाचेगी’ या गाण्यासाठी सोनाक्षीने आपले वजन बरेच घटविले होते. या गाण्यावर पाण्याप्रमाणे पैसा खर्च करण्यात आला होता. गाण्यासाठी स्टुडिओमध्ये यमुना नदीचा किनारा तयार करण्यात आला होता. हे काम अत्यंत खर्चिक होते, असे बोनीने सांगितले. आजकालच्या अभिनेत्री इतक्या कमी वेळात सोनाक्षीसारखे नृत्य कौशल्य आत्मसात करू शकत नाहीत, असे सांगून तिच्या सोबत लवकरच नव्या चित्रपटात काम करण्याची इच्छा त्याने बोलून दाखविली. एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक बोनी तयार करणार असून, हिरोईन म्हणून सोनाक्षीची निवड केली आहे.