‘हॅ प्पी न्यू ईअर’ या चित्रपटात साजीद खान, प्रभुदेवा, डिनो मोरियोसारख्या कलाकारांसह मलाईका अरोरा खानही एका महत्त्वहीन भूमिकेत दिसली आहे. साजीद फराह खानचा भाऊ आहे, तर प्रभुदेवाने फराहशी कोरिओग्राफरचे नाते निभावले आहे. डिनोकडे सध्या तसेही काम नाही, या बहाण्याने त्याला ब:याच लोकांनी पाहिले तरी; पण मलाईकाला अशी कोणतीच मजबुरी नव्हती, तरीही तिने ‘हॅप्पी न्यू ईअर’ या चित्रपटात काहीही महत्त्व नसलेली भूमिका का निभावली, असा प्रश्न अनेकांना पडतो. फराह आणि साजीद दोघेही मलाईकाला त्यांच्या चित्रपटांसाठी लकी मानतात. मलाईकाच्या उपस्थितीने चित्रपट चालतो, अशी या दोघांचीही भावना आहे. या दोघांची जिद्द आणि त्यांच्याशी असलेल्या जवळिकीच्या संबंधांमुळे मलाईका हे चित्रपट करतेही; पण मलाईकाला थोडी चांगली भूमिका तरी द्यायला हवी. मलाईकाने साकारलेली भूमिका ज्युनिअर आर्टिस्टही साकारू शकली असती.