Join us

म्हणून सोशल मीडियावरून गायब आहे कॅट

By admin | Updated: October 9, 2014 00:47 IST

बॉलीवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ हिला तिचे म्हणणे मांडण्यासाठी सोशल मीडियाची आवश्यकता नाही

बॉलीवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ हिला तिचे म्हणणे मांडण्यासाठी सोशल मीडियाची आवश्यकता नाही. तिला फेसबुक आणि टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियावर येणे पसंत नाही. ती म्हणते, ‘मला जे काही सांगायचे असते, ते मी माझ्या चित्रपटांच्या प्रमोशनदरम्यान सांगत असते, मग माझे विचार मांडण्यासाठी सोशल मीडियाची काय आवश्यकता आहे.’ सोशल मीडियावर होणारी निंदा सहन करू शकत नसल्याचे ती म्हणते. मी कित्येक वेळा पाहिले आहे की, स्टार्स आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये वाद होतात. कोणी माझ्यासाठी काही चुकीचे लिहीत असेल, तर मी गप्प बसणार नाही. मी चुकीच्या गोष्टींना उत्तर देणारच.त्यापेक्षा मी सोशल मीडियापासून लांब राहिलेलेच योग्य आहे.’