Join us  

शो मस्ट गो आॅन - राकेश बापट

By admin | Published: April 02, 2016 2:20 AM

‘चित्रीकरणादरम्यान स्टंट तसेच फाइट सिक्वेन्सचे सीन करताना नायकांना किरकोळ जखमा होतच असतात. मराठी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असे प्रकार क्वचितच घडले असतील.

‘चित्रीकरणादरम्यान स्टंट तसेच फाइट सिक्वेन्सचे सीन करताना नायकांना किरकोळ जखमा होतच असतात. मराठी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असे प्रकार क्वचितच घडले असतील. अशीच एक घटना ‘वृंदावन’ या मराठी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली. या सिनेमाचा नायक राकेश बापट याला अ‍ॅक्शन सिक्वेन्स करीत असताना पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, राकेशला ते कळालेदेखील नव्हते. तब्बल ४० मिनिटांनंतर राकेशला या दुखापतीची जाणीव झाली. सीनदरम्यान काँक्रीटच्या भिंतीपलीकडे जंप मारत असताना राकेशचा अपघात झाला. त्याच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाल्याची शंका युनिटला आल्यामुळे सिनेमाचे चित्रीकरण तेथेच थांबवून त्याला तत्काळ दवाखान्यात हलविण्यात आले होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पनवेल येथील महागड्या अशा आयुष रिसॉर्टमध्ये झालेल्या या सिनेमाचे चित्रीकरण पुढे लांबवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. मात्र, इतर कलाकारांच्या तारखा तसेच चित्रीकरणाचे शेड्यूलिंग लक्षात घेता, राकेशनेच ठरावीक वेळेत चित्रीकरण पूर्ण केले. राकेशसोबतच पूजा सावंत तसेच वैदेही परसुरामीही मुख्य भूमिकेत असणार आहेत. अशोक सराफ, महेश मांजरेकर, मोहन जोशी, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे या दिग्गज अभिनेत्यांची फौजदेखील या चित्रपटात पाहायला मिळेल. टी.एल.व्ही. प्रसाद या सुप्रसिद्ध दक्षिणात्य दिग्दर्शकाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पूर या तिघांनी मिळून ‘रिअलस्टिक फिल्म कंपनी’ या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. येत्या ८ एप्रिलला ‘वृंदावन’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल.